ABOUT US
“आमुचे प्रेरणास्थान- लोकनेते शामरावजी तथा अण्णासाहेब पेजे.
आठवण जनमनातील अतूट स्नेहबंधाची
अजातशत्रू, निर्भिड, विशुद्ध स्वाभिमानी
ताठ कण्याच्या लोकनेत्याची
धनांधकारात दिप जसा वनी
मृत्युंजय कार्यरूपी वसे हे दैवत आमुच्या मनी”

असे आमुचे सर्वांचेच लाडके नेतृत्व. नियतीने माणसांमध्ये महानतेचा एक स्फुल्लिंग ठेवलेला असतो. सर्वांनाच तो प्रज्वलित करता येत नाही पण काही थोडयांनाच ते जमते. ज्यांना ते जमते, ती माणसे आपले स्वतःचे जीवन प्रकाशमय तर करतातच; पण सभोवतालच्या माणसांचेही जीवन उजळतात. अर्थात हा महानतेचा स्फुल्लिंग प्रज्वलित करण्यासाठी त्यांना जीवनातील स्वार्थाची आहुती देऊन सुवर्णाची तप्त मुद्रा काळावर उमटवावी लागते, तेव्हाच त्यांच्या आयुष्याचे सोने होते. अशी माणसं मग मृत्युंजय ठरतात. देह नष्ट झाला तरी त्यांच्या विमल चारित्र्याने ती दिपस्तंभासारखी समाजात वावरत असतात.
शामरावजी तथा अण्णासाहेब पेजे, हे ही अशा व्यक्तींपैकी एक ! अशा थोर विभूतीचा जन्म लक्ष्मीबाई व लक्ष्मण धोंडिबा पेजे यांच्या उदरी १७ जानेवारी १९१७ मध्ये झाला. या करारी जोडप्याने आपल्या पाल्यावर अतिशय चांगले संस्कार केले. अण्णांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व मेहनतीच्या जोडीने कष्टकरी कुणबी समाजात पहिला पदवीधर होण्याचा बहुमान मिळविला. १९३४-४४ हा त्यांचा विदयार्थी दशेचा काळ. या काळातच त्यांनी आपल्या अडाणी, रूढीग्रस्त समाजाचे प्रबोधन करण्याचा जाणीवपूर्वक व हिरीरीने प्रयत्न केला.
१९४६ साली अण्णांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते ५० वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरले विधानसभा व विधान परिषद सदस्य तसेच आमदार, खासदार म्हणून त्यांनी २६ वर्षे लोकांचे प्रतिनिधीत्व केले. स्वप्नांचा अखंड पाठलाग, ध्यास आणि ते सत्यात उतरवण्यासाठी परिपूर्ण मेहनत घेतली.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी जनमताचे एकनिष्ठपणे, निर्भयपणे प्रतिनिधीत्व केले. आदिवासींचे प्रश्न, द्विभाषिक मान्यता देणा-या विधेयकांना विरोध करण्याचे धाडस दाखवले. अनेक पदांवर कामकरण्याची संधी मिळाली. त्या संधीचा फायदा समाजाशी केला. अशा अण्णांवरती सर्वच समाजातील लोकांनी प्रेम केले. त्यांना सर्व समाज्याचा एकमुखी पाठिंबा लाभला.
संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नासंबधीची काँग्रेसची भूमिका, ज्या गरीब कुणबी समाजात अण्णा जन्मले त्या कोकणातील कुणबी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागसलेपणा, तसेच कुळांची समस्या या बाबत अण्णांनी आपला आवाज लोकसभेत आणि विधानसभेत उठवला. परंतु आपल्या समाजातील बांधवांच्या मनातील अंधश्रद्धा, चुकीचे रीतीरिवाज यावर पोटतिडकीने बोलत आणि त्यांना आदर्श जीवनाबद्दल मार्गदर्शन करत व्यक्तीगत जीवनात त्यांनी राजकीय विरोधकांशी अत्यंत स्नेहाचे संबंध ठेवले. सुमारे चाळीस वर्षे अण्णांनी कोकणवासीयांची सेवा केली. “नियतं कुरू कर्म” हाच अण्णांचा स्थायीभाव. आणि यातूनच कित्येकांची कामे त्यांनी केली. परंतु परिस्थिती नसतानाही कित्येकांना आर्थिक मदत करून गोरगरीबांच्या घरातील अंधार दूर केला. महाराष्ट्राचे लाडके नेते कै. यशवंतराव चव्हाण यांनी तर महाराष्ट्रातील खुर्चीसाठी कधीही हापापलेल्या नसणा-या दोन व्यक्तीत अण्णांची निवड केली.
ख-या अर्थाने अण्णांच्या निःस्वार्थीपणाचा असामान्य असा गौरव केला. असे आमुचे प्रेरणास्थान आणि या असामान्य व्यक्तीत्वाचा लाडका शिष्य श्री. नंदकुमार धोंडू मोहिते.
अण्णांनी आपल्या लाडक्या शिष्याच्या पाठीवर प्रेरणेची थाप मारली आणि गुरूने दिलेला वसा अखंड सुरू ठेवण्याचे महान कार्य करणारा शिष्य म्हणजे गुरू-शिष्याच्या परंपरेतील एक अविस्मरणीय अशी जोडी. कोणतेही राजकीय पाठबळ नसलेले, स्वतःची अशी कोणतीही वारसाने संपत्ती लाभलेली नाही तथापि गुरूची प्रेरणा हीच संपत्ती मानून त्यांच्या पाऊलांवर आपल्या पाऊलखुणांचा ठसा उमटवत श्रमिक किसान सेवा समितीची स्थापना शिवार आंबेरे सारख्या दुर्गम खेडयातील माळरानावर जून १९९१ साली केली. ‘श्रमिकांचे प्रतिक’ म्हणून या संस्थेने श्रमिक विद्यालयाची १९ जून १९९१ ला स्थापना केली. नुकतीच २८ वर्षे संस्थेला व श्रमिक विद्यालयाला पूर्ण झाली. अतिशय ज्ञानमय वातावरणात विविध क्षेत्रातील बुद्धिवंतांच्या, मान्यवरांच्या, सावित्रीच्या मानक-यांच्या उपस्थित रौप्य महोत्सवी वर्ष पार पडले. या विद्यालयाची उत्तुंग भरारी इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकताना राज्यस्तरीय अॅथलेटीक्स क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरील विविध उपक्रमांमध्ये सहभाग दर्शवितात त्यानंतर स्टार प्रवाह वाहीनी, सहयाद्री वाहीनी वरळी (धिना धिन धा, दम दमा दम, नृत्य मल्हार). काशीनाथ घाणेकर करंडक एकांकीका स्पर्धा, एन्. एम्. एम्. एस्. स्पर्धा परीक्षा यामधे ही विद्यार्थी विशेष गौरवास पात्र ठरले. शाळेच्या २४ बॅचेसचा विचार करता दहावीच्या निकालाची प्रतिवर्षी वृद्धी होत १०० टक्के निकालाची परंपरा विदयालयामध्ये सुरू आहे.
गौरवशाली रत्नभूमी मध्ये शिवार आंबेरे गावी नंदकुमार मोहिते या ज्ञान दात्या सुर्याचा उदय व्हावा हे या गावचे व ग्रामस्थांचे सद्भाग्य ! हे नाव गावा पुरते सिमित न रहाता जिल्हाभर व जिल्हया बाहेरही अभिमानाने घेतेले जाते.
दिपस्तंभ उभा सागरी, मार्ग दाखवी सकलांना
वृक्ष उभे हे उन्हामध्ये छाया देती श्रमिकांना
फुले बहरली वेलीवरती, सुगंध देती पथिकांना
अखंड तेवत ‘नंदादीप’, प्रकाश देई सर्वांना ||
या काव्यशब्दांच्या ओंजळीने ज्यांचे वर्णन करावे असे सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणजे, आमुचे मोहिते साहेब.
नवनिर्मीतीचा ध्यास हाच मोहिते साहेबांचा जीवन अभ्यास, श्रमजीवी, शेतकरी पालकांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणापासून ते पदवी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी नव्या इतिहासाची निर्मिती केली. विदयामंदिराचे विदया संकूल असा विस्तार झाला. सन २००८ मध्ये लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनतर श्रमिक विद्यालयाला ५वी ते ७ वी चे वर्ग जोडण्यात आले. दर्जेदार शिक्षणासाठी ५ वी पासून सेमीचे वर्ग सुरू झाले. प्रत्येक घरामध्ये पदवीचे शिक्षण पोहचावे हा मानस ठेवून २००८ मध्ये लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. व २००९ मध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ फेस्टीवल जिल्हा व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, ढोल वादन स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त करत महाविद्यालयाच्या मानांकनात मौलीक भर टाकली आहे. बारावीच्या ७ ही बॅचेसचा निकाल उत्तरोत्तर वाढत जाऊन तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के राखण्याची परंपरा तसेच टी वाय बी.ए, बी. कॉम, बी. एस्सी या तिनही शाखांचा निकाल चढता ठेवण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे.
नवनिर्मीतीचा “मराठी पाऊल पडते पुढे” या प्रमाणे सन २०१३ मध्ये ‘क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले इंग्लिश मिडीअम स्कूल’ ची स्थापना झाली. एका लावलेल्या ज्ञानमय वृक्षाचा आज वटवृक्ष बनला आहे.
एका दुर्गम खेडे गावात साधन संपत्तीचा अभाव असलेल्या ठिकाणी दर्जेदार मोफत शिक्षण देणारी शाळा, महाविद्यालय, अतिशय मेहनत, अखंड, अविरत ध्यास घेऊन मोहिते साहेबांनी सुरू केली म्हणजे ही जणू त्यांनी दिलेली आपल्या गुरूला गुरूदक्षिणा ! मोहिते साहेबांच्या शैक्षणिक कार्याचा केंद्र बिंदू म्हणजे गरीब शेतकरी. या शैक्षणिक संकुलात ध्येयवादी, कर्तृत्ववान विद्यार्थी निर्माण व्हावेत हे साहेबांचे ध्येय आहे.
अशा दिव्यदृष्टी लाभलेल्या गुरूशिष्याच्या या अतूट स्नेहबंधाला अपूर्व अशी जनमताची साथ लाभली. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मोहिते साहेब म्हणजे जणू या गावाला लाभलेला अनमोल असा हिरा !
संस्थापक, अध्यक्ष मा. नंदकुमार मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदानाची वाटचाल अखंड सुरु आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक, ग्रामस्थ कर्मचार्यांच्या एकजुटीतून महाविद्यालय आकार घेत आहे. अनेकांच्या सहकार्याने स्वप्न साकार होत आहे.
A Few Words About
We have Well Educated & knowledgeable Teachers Staff

Thool Sir
Principal - Sr. College

Ambekar Sir
Principal - Jr. College

Thool Sir
Principal - Sr. College

Thool Sir
Principal - Sr. College
Follow US

Classrooms
We have well maintain clean classrooms.

Laboratory
Laboratory with Latest Equipments

Library
We have all books & Study Material in our Library

Classrooms
We have a big Playground for Academic Activities
Address
Shiwar Ambere, Taluka - District - Ratnagiri, Maharashtra 415626
Contact Us
Mobile No : 9370317769 lspcollege2009@gmail.com

Banking Partners
Bank of Maharashtra
A/c No : 140510210002575
Branch Name : Pawas
IFSC COde : MHBK0001405